सूरझंकार

पुण्यामधील बंगालचे शब्दचित्र

   सन १९९४ मध्ये पुण्यातील काही उत्साही बंगाली नागरिकांनी, बंगालच्या समृद्ध संस्कृतीचा परिचय लोकांना व्हावा या हेतूने “सूरझंकार” या मान्यताप्राप्त चॅरिटेबल टस्टची स्थापना केली.

पुण्याच्या संस्कृतीशी बंगाली संस्कृतीची नाळ जुळावी असा हेतू त्यामागे होता.

या दिशेने उचललेले पहिले पाऊल म्हणून पुण्यामध्ये अधिकृतपणे रवींद्र संगीत शिक्षणाचे वर्ग सुरू झाले.
त्यासाठी कोलकातामधील ‘गीतबितान`* ( म्हणजे गीत – वितान, अर्थात गीतांचे आकाश ) या संस्थेचे सहाय्य लाभले. या उपक्रमाला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली आणि सूरझंकारच्या वेगवेगळ्या शाखाही सर्वत्र पसरल्या. सूरझंकारने आपल्या अभ्यासक्रमात अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश केला आहे. ज्याचा हेतू रवींद्रांच्या रचनांतील पुनरावृत्ती आणि क्लिष्टता टाकून त्यांचे प्रभावी सादरीकरण करणे हा आहे.

सूरझंकारने पुण्यामध्ये खालील अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत:
· ५ वर्षे ६ महिन्यांचा ‘गीतभारती’ पदवी अभ्यासक्रम.
· २ वर्षांचा रविंद्र संगीताचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
· २००४ पासून सूरझंकारने बंगाली भाषेचे अभ्यासवर्ग पुण्यातील स्थानिक आणि बंगालपासून दुरावलेली बंगाली मुले यांच्यासाठी सुरू केले आहेत.
· २०१२ पासून रवींद्र संगीत आणि बंगाली भाषा या दोहोंचे वर्ग कोरेगाव पार्कमध्ये पूना ब्लाइंड स्कूलच्या आवारात भरवले जातात. त्यामुळे तेथील अंध मुलांनाही त्याचे प्रशिक्षण घेता येते.

अनेक विद्यार्थ्यांनी त्याचा फायदाही घेतला आहे. पुण्यातील हे एक महतवाचेआणि मान्यताप्रत अभ्यासकेंद्र आहे. आज पुणेकर नागरिकांच्या मदतीने आणि पाठींब्याने १००हून अधिक विद्यार्थी वेगवेगल्या वर्गांत शिकत आहेत. आपल्या संकृतीतील विविधरंगी सौंदर्याचे आकलन अधिकाअधिक लोकांना व्हावे,हाच सूरझंकारचा प्रमुख हेतू आहे. *रवींद्रनाथ टागोरांच्या निर्वाणानंतर कोलकातातील लोकांना अशा एका संस्थेची गरज भासू लागली, ज्यामध्ये शांतिनिकेतनमध्ये ज्या स्वरुपात रवींद्र संगीत शिकवले जात होते तश्याच मूळ स्वरूपात ते लोकांपर्यंत पोचवले जाईल.

डिसेंबर १९४१ मध्ये इंदीरादेवी आणि शैललजारंजन मुजुमदार यांच्या पाठींब्याने ”गीतबितान “ ही संस्था कोलकत्यात स्थापन झाली. संस्थेच्या प्रथम शिक्षकांमध्ये अनादिकुमार दस्तीदार , कनक बीस्वास, नीहारबिंदू सेन, शुभो गुहाथाकुरता इत्यादींचा समावेश होता.

ही संस्था खालील अभ्यासक्रम चालविते.
· रविंद्रसंगीताचा ५ वर्षांचा अभ्यासक्रम - गीताभारती उपाधी
· शास्त्रीय संगीताचा - संगीत भारती.
· शास्त्रीय नृत्याचा - नृत्यभारती

वरील उपाधी अभ्यासक्रमाला विश्वभारती विद्यापीठ , कोलकाता विद्यापीठ, रवींद्र भारती विद्यापीठ या संस्थांमध्ये ‘बी-म्युझिक’ ह्या पदवीसाठी मान्यता मिळालेली आहे. हा अभ्यासक्रम गेली ७० वर्षे कोलकात्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे.